काजूचा दर ठरला..?

Edited by: भरत केसरकर
Published on: April 11, 2024 13:35 PM
views 2222  views

सिंधुदुर्ग : गेले कित्येक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू दर संदर्भात शेतकरी बागायतदार यांच्या संभ्रमावस्था होती काजू खरेदी दर बाबत वाद निर्माण झाले होते. मात्र, या वादावर अखेर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पडदा टाकला असून काजू शेतकरी बागायतदारांना 125 रुपये व 130 रुपये दर यावर्षी मिळणार आहे त्यासाठी फॉर्मुला ठरवण्यात आला असून काजू कारखानदार पाच रुपये जादा दर देणार आहेत तर शासनाचे दहा रुपये असे पंधरा रुपये काजू खरेदीवर दर मिळणार आहे.

गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदार आणी शेतकरी काजू बी ला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आक्रमक झाले होते. यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली होती.सध्या 110 रुपये काजू खरेदी होत आहे त्यामुळे आज झालेल्या बैठकीत शासनाचे दहा रुपये आणि कारखानदारांचे पाच असे पंधरा रुपये जादा काजू खरेदीवर दर मिळणार आहे त्यामुळे सरासरी 130 रुपये काजू खरेदी आता होणार आहे आचार संहिता संपल्यानंतर शासनाने 200 कोटी रुपये काजू बोर्डाकडे मंजूर केले आहेत त्यानुसार एक किलो मागे दहा रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे हे दहा रुपये शेतकऱ्यांना जून महिन्यात मिळणार आहेत अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दिपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

दीपक  केसरकर यांच्या निवासस्थानी काजू बागायतदार आणि कारखानदार यांची संयुक्त बैठक झाली.या बैठकीत कारखानदार यांनी बाजारपेठेतील काजू दर खरेदीसाठी पाच रुपये ज्यादा दर देण्याचे मान्य केले त्यामुळे कारखानदार करांकडून पाच रुपये व शासनाकडील दहा रुपये असे एका किलोमागे 15 रुपये दर मिळणार आहे तर सध्या काजूचा दर खरेदीवर 110 रुपये व 115 रुपये असा आहे या दोन्ही दरांमध्ये पंधरा रुपयाची वाढ झाल्यानंतर 125 रुपये व 130 रुपये काजू खरेदी आता होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पण दिलासा मिळाला आहे हा झालेला निर्णयाला शेतकरी बागायतदारांनी मान्य केले आहे .याबाबत फळबागायत संघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विलास सोमा सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुढील वर्षी शासनाकडून योग्य पद्धतीने दर दिला जाणार आहे मात्र सद्यस्थितीत कारखानदार यांनी पाच रुपये ज्यादा दर आणि शासनाचे दहा रुपये असा वाढीव दर आता यंदाच्या वर्षी मिळणार आहे असा निर्णय झाला आहे त्यामुळे गेले काही दिवस सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले भागातील काजू शेतकरी बागायतदार खरेदी वरून जो वाद निर्माण झाला होता त्यावर अखेर आज योग्य तोडगा काढण्यात आला आहे त्यामुळे उद्यापासून काजू खरेदीला सुरुवात होणार आहे असे सावंतवाडी काजू शेतकरी बागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांनी स्पष्ट केले . यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी यावेळी काजू शेतकरी बागायतदार अभिलाष देसाई दोडामार्ग तालुका अध्यक्ष संजय देसाई निलेश देसाई आकाश नरसुले राकेश धणे विठ्ठल मुरुडकर जनार्दन नाईक जगदेव गवस घनश्याम नाईक प्रदीप सावंत तर कारखानदार सुरेश नेरुलकर सुरेश भाऊ लेकर सुधीर झांटये आधी उपस्थित होते. आजच्या बैठकीत इम्पोर्ट ड्युटी अडीच टक्के आहे ती आचारसंहिता संपल्यानंतर 18% होणार आहे असेही दिपक केसरकर यांनी आश्वासन दिले.याबाबत दोडामार्ग शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय देसाई यांनी समाधान व्यक्त केले आहे.