
सावंतवाडी : कोकण दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांची भाजप युवा नेते, आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सावंतवाडी येथील सरस्वती निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर व आमदार नितेश राणे यांच्यात कोकणाच्या विकासा संदर्भात चर्चा झाली. यावेळी कोकणच्या विकासाला अधिक हेगती मिळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रयत्नशील राहणार असा शब्द विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर यांनी आ. नितेश राणे यांना दिला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.