पैशाची ताकद आम्हाला हरवू शकत नाही : दीपक केसरकर

Edited by:
Published on: November 08, 2024 19:27 PM
views 165  views

वेंगुर्ला : पैशाची ताकद आम्हाला हरवू शकत नाही. आम्ही सर्वजन मिळून मतदारसंघात रामराज्य आणू टीकाकारांमुळे काम करायला अधिक बळ मिळत आहे. विरोधक फक्त आरोळ्या ठोकतात, त्यांच्याकडून मतदारसंघात शुन्य काम झालेय, आपण गेल्या पाच वर्षात सुमारे पंचविसशे कोटीचा निधी सावंतवाडी मतदारसंघासाठी दिला आहे विकासाशिवाय आपला दुसरा अजेंडा नाही. विरोधकांना ओरडू दे, आपण विकासकामांतून लोकांची मने जिंकली आहेत. अमिषांना बळी न पडत महायुतीच्या विजयासाठी एकदिलाने काम करून सर्वांत मोठ्या विजयासाठी सज्ज होऊया, असे आवाहन दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे केले.

सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे रिंगणात असलेल्या दीपक केसरकर यांच्या वेंगुर्ला शहरातील निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ मंगळवारी (७ नोव्हें) रात्री शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डूबळे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, सुषमा प्रभूखानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि. प. माजी सदस्य दादा कुबल, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, शिवसेना महिला तालुका संघटक दिशा शेटकर, वसंत तांडेल, बाळा दळवी, बाबली वायंगणकर,नाथा मांजरेकर, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर, स्वप्नील गावडे, सागर गावडे यांच्यासाहित महायुतीने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना केसरकर म्हणाले, आपण सातत्याने काम करणारा मनुष्य आहे. असंख्य पर्यटनपूरक प्रकल्प प्रस्तावित केले  आहेत.  मच्छीमार महिला भगिनींसाठी सिंधुरत्न योजनेद्वारे प्रचंड काम केल आहे. कृषी आर्मीतून नवीन रोजगार संध्या उपलब्ध केल्या आहेत. कामांची लिस्ट संपणार नाही. विरोधकांना उघड आव्हान आहे. खोटारडेपणा बंद करा, तुम्हाला उघड पाडायला मागेपुढे बघणार नाही जेवढा सॉफ्ट आहे तेवढाच कणखर आहे. त्यामुळे विचार करून बोला पुढचे बारा दिवस खुप महत्वाचे आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विचलित होऊ नका. निवडणूक काळात अनेक उफवा उठतात. त्याकडे लश्न देवू नका. मनापासून एकत्र येऊया. मोठा विजय मिळवूया असे आवाहन केले. 

१५ हजारचे मताधिक्य देणार 

तालुक्यात बैठका घेऊन प्रत्येक कार्यकर्यांना भेटत आहोत. किमान १५ हजारच मताधिक्य महायुती म्ह्णून केसरकर देण्याच्या दृष्टीने यंत्रणा राबवण्यात येत आहे. जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहेत.. पुढच्या काळात सावंतवाडी विधानसभा मतदार संघाला विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाऊया असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.