'संगीत वीज म्हणाली धरतीला' नाटकाने पटकावली 5 मानाची पारितोषिके

महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा
Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2026 11:33 AM
views 20  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सावंतवाडीच्या क्षितिज इव्हेंट संस्थेने सादर केलेल्या 'संगीत वीज म्हणाली धरतीला' या नाटकाने आपल्या कलागुणांच्या जोरावर ५ मानाची वैयक्तिक पारितोषिके पटकावून कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सांगली येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिर येथे ७ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या अंतिम फेरीत एकूण १४ नाट्यप्रयोगांमध्ये चुरस पाहायला मिळाली. यामध्ये क्षितिज इव्हेंटच्या कलाकारांनी नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा आणि अभिनयात आपली छाप पाडली.


सावंतवाडी क्षितिज इव्हेंटच्या अभिनय रौप्य आज्ञा कोयंडे, रंगभूषा (प्रथम) संजय जोशी, नेपथ्य (द्वितीय) दत्तात्रय उर्फ बाळ पुराणिक, वेशभूषा (द्वितीय) वैभवी पुराणिक, प्रकाश योजना (तृतीय) अभिषेक कोयंडे यांनी बक्षीसे प्राप्त केली.‌ ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत समर्थ थिएटर्स, गोवा या संस्थेच्या संगीत कधी तरी कोठे तरी या नाटकास प्रथम पारितोषिक, भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे या संस्थेच्या संगीत पद्याराणी या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे, मुंबई या संस्थेच्या संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 


दिग्दर्शनास प्रथम पारितोषिक अनिल आसोलकर (नाटक-संगीत कधी तरी कोठे तरी), द्वितीय पारितोषिक संजय नरहर (नाटक-संगीत पद्माराणी), तृतीय पारितोषिक घनःश्याम जोशी (नाटक-संगीत स्वरसम्राज्ञी), नाटयलेखन प्रथम पारितोषिक रमेश नाईक (नाटक-संगीत पद्माराणी), द्वितीय पारितोषिक मयुरेश जोशी (नाटक-संगीत फॅमिली ड्रामा), तृतीय पारितोषिक मकरंद देशमुख (नाटक-संगीत समर्पण), संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक आशिष केसकर (नाटक-संगीत पद्माराणी), द्वितीय पारितोषिक शिवानंद दाभोलकर (नाटक-संगीत भर्तृहरी), तृतीय पारितोषिक दामोदर शेवडे (नाटक-संगीत तेजशलाका), नेपथ्य प्रथम पारितोषिक विश्वास पांगारकर (नाटक-संगीत पद्माराणी), द्वितीय पारितोषिक दत्तात्रय पुराणिक (नाटक- संगीत वीज म्हणाली धरतीला), तृतीय पारितोषिक भास्कर शेटगावकर (नाटक-संगीत कधी तरी कोठे तरी), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक संजय तोडणकर (नाटक-संगीत सोन्याचा पिंजरा), द्वितीय पारितोषिक अशलेश गिमोणकर (नाटक- संगीत कधी तरी कोठे तरी), तृतीय पारितोषिक अभिषेक कोयंडे (नाटक-संगीत विज म्हणाली धरतीला), वेशभूषा प्रथम पारितोषिक नुपूर खटावकर (नाटक-संगीत समर्पण), द्वितीय पारितोषिक वैभवी पुराणिक (नाटक- संगीत वीज म्हणाली धरतीला), तृतीय पारितोषिक पुजा तांबे (नाटक-संगीत सोन्याचा पिंजरा), रंगभूषा: प्रथम पारितोषिक संजय जोशी (नाटक-संगीत वीज म्हणाली धरतील), द्वितीय पारितोषिक प्रसाद गद्रे (नाटक-संगीत कट्टयार काळजात घुसली), तृतीय पारितोषिक चैतन्य थरकुटे (नाटक-संगीत शाकुंतल), संगीतसाथ ऑर्गन वादक प्रथम पारितोषिक दामोदर शेवडे (नाटक-संगीत तेजशलाका), द्वितीय पारितोषिक शिवानंद दाभोलकर (नाटक- संगीत भर्तृहरी), तृतीय पारितोषिक पार्थ परांजपे (नाटक-संगीत ऐश्वर्यवती), संगीतसाथ तबला वादक प्रथम पारितोषिक विठ्ठल मेस्त्री (नाटक- संगीत भर्तृहरी), द्वितीय पारितोषिक पुनित गडेकर (नाटक- संगीत कधी तरी कोठे तरी), तृतीय पारितोषिक आदित्य तारी (नाटक-संगीत तेजशलाका), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक विश्वास पांगारकर (नाटक- संगीत पद्माराणी), सुरज शेटगांवकर (नाटक- संगीत कधी तरी कोठे तरी), श्रुती कुलकर्णी (नाटक- संगीत फॅमिली ड्रामा), आज्ञा कोयंडे (नाटक- संगीत विज म्हणली धरतीला), उत्कृष्ट गायन रौप्यपदक अभिषेक काळे (नाटक- संगीत कट्यार काळजात घुसली), अजिंक्य कुलकर्णी (नाटक-संगीत पद्माराणी), शारदा शेटकर (नाटक-संगीत कधी तरी कोठे तरी), अनुष्का आपटे (नाटक- संगीत शाकुंतल), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ऐश्वर्या भोळे (नाटक-संगीत पद्माराणी), हर्षाली केळकर (नाटक- संगीत समिधा), प्राची शेटगांवकर (नाटक-संगीत तेजशलाका), प्राची चौधरी (नाटक-संगीत समर्पण), राधा टिकेकर (नाटक-संगीत स्वरसम्राज्ञी), कौशिक कुलकर्णी (नाटक-संगीत पद्याराणी), गिरीष जोशी (नाटक संगीत समिधा), सचिन केळकर (नाटक-संगीत फॅमिली ड्रामा), दिनेश म्हैसकर (नाटक- संगीत कट्यार काळजात घुसली), अनिकेत आपटे (नाटक-संगीत ऐश्वयवती) गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ऐश्वर्या भोळे (नाटक-संगीत पद्माराणी), जान्हवी खडपकर (नाटक- संगीत समिधा), मधुरा सोमण (नाटक- संगीत ऐश्वर्यवती), देवश्री शहाणे (नाटक-संगीत स्वरसम्राज्ञी), मयुरी हरीमकर (नाटक- संगीत समर्पण), दत्तगुरु केळकर (नाटक-संगीत कधी तरी कोठे तरी), प्रमोद परब (नाटक-संगीत भर्तृहरी), श्रीरंग जोशी (नाटक- संगीत कट्यार काळजात घुसली), विपुल निमकर (नाटक- संगीत स्वरम्राज्ञी), वज्रांग आफळे (नाटक- संगीत पद्माराणी) यांना प्राप्त झाली.  दि. ७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत विष्णूदास भावे नाट्यमंदिर, सांगली येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. लक्ष्मण पाटील, श्री. राजेंद्र नाईक, गांधाली ओम, श्री. सुभाष भागवत आणि श्री. राज पाटील यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या संगीत नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले. संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार संगीत नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.