देवगड तसीलदार रमेश पवार यांचा 'कोकणसाद LIVE' स्मार्ट लीडर पुरस्काराने सन्मान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 04, 2026 11:37 AM
views 60  views

देवगड : देवगड तहसील कार्यालय येथील तहसीलदार रमेश पवार यांची कर्तव्य दक्ष अधिकारी तसेच  त्यांच्या माध्यमातून झालेली  अनेक कामे यामुळे यंदाच्या  कोकणसाद LIVE च्या स्मार्ट लीडर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी कोकणसाद LIVEच्या 12 व्या वर्धापनदिना निमित्त या पुरस्कारांचे वितरण सावंतवाडी येथे  करण्यात आले. महाचॅनेल कोकणसाद LIVEचा 12व्या वर्धापनदिनी रविवारी दिनांक 1 मार्च रोजी सावंतवाडी येथील  मोठ्या थाटात संपन्न झाला.या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो.

यावर्षी प्रशासनातील कर्तव्य दक्ष कार्यतत्पर अधिकारी म्हणून देवगड तहसीलदार रमेश पवार यांची विशेष निवड करण्यातआली होती. कणकवली तहसील कार्यामध्ये देखील तसीलदार या प्रशासकीय सेवेमध्ये असताना त्यांच्या कार्याची कोकणसाद लाईव्ह कडूनदखल घेऊन त्यांचा या स्मार्ट लीडर या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.रमेश पवार हे गेली कित्येक वर्षे प्रशासकीय सेवेत कार्यरत असून तसीलदार रमेश पवार यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव आणि लोकांभूमिक असलेल्या कामकाज पद्धतीमुळे आर. जे. पवार यांची देवगड तहसीलदार म्हणून पुन्हा नेमणूक करण्यात आली होती.देवगड तहसीलदार म्हणून कामकाज करताना काही महिन्यापुर्वीच पवार यांनी तहसील परिसर कपाउंड,सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंच अभ्यंगतांसाठी बैठक व्यवस्था आदी कामकाज करवून घेतले होते.जनतेचा तहसीलदार म्हणून सर्वसामान्य जनमानसात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.याच सर्व त्यांच्या प्रशासकीय सेवेतील तत्पुरते मुळे त्यांच्या या कार्याची कोकण साद लाईव्ह कडून दखल घेत त्यांना हा स्मार्ट लीडर पुरस्काराणे सन्मानिक करण्यात येते तसेच तसीलदार रमेश पवार यांना प्रशासकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव असून या क्षेत्रात काम करीत असून या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करून जनतेला सेवा देत आहेत.याचबरोबर प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लहान शाळकरी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना व्यासपीठ देखील त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे काम देखील त्यांच्या माध्यमातून होत आहे.

या माध्यमातून देखील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकणसाद लाईव्हने प्रशासकीय सेवेतील कार्यतत्पर अधिकारी म्हणून  देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मानाचा स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.