पालखी महोत्सवामुळे वाढली शिमगोत्सावची रंगत

राजे ग्रुपच्या वतीने शहरात ‘पालखी महोत्सवाचे’ आयोजन
Edited by:
Published on: March 12, 2025 15:11 PM
views 66  views

मंडणगड: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग्न राजे ग्रुप  मंडणगड यांच्यावतीने मंगळवार दि. 11 मार्च 2025 रोजी शहरातील परकार कॉम्पलेक्स परिसरात पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात कोंझर, बोरघर, टाकवली, आंबवणे, वडवली, माहु आदि गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्यांनी भाग घेतला व पालखी नृत्य कलेचे सादरीकरण केले. याचबरोबर तांबडीकोंड येथील खेळ्यांनी कोळीनृत्यांचा कार्यक्रम सादर करून मर्दानी खेळ सादर केले. त्यामुळे शहराच्या शिमगोत्सवाची रंगत चांगलीच वाढली. भाविकांनाही मोठय़ा संख्येने पालख्यांची नृत्य कला पाहण्यासाठी गर्दी करुन  रंगलेल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

पहील्या होळीनंतर खेळी जाण्याची प्रथा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांनी वर्षानुवर्षे सांभाळली असून शिमगोत्सवाच्या वेगवेगळ्या चालिरीतींसाठी कोकणातील अन्य गांवाप्रमाणे तालुक्यातील अनेक गावे प्रसिध्द आहेत. पहिल्या होळीनंतर ग्रामदवेतांच्या मंदिरात स्थानापन्न झालेल्या पालख्या या निमीत्ताने सिमोल्लंघन करुन गावोगाव जाऊन घरोघर फिरुन भाविकांना दर्शनाची संधी देतात. कोन्हवली, टाकवली येथील पालख्यांसमवेत असलेले संकासुर शिमगोत्सवाचे आर्कषण ठरते. होमापुर्वी या पालख्या गावात जाताना शहरात एकत्र येतात, या संधीच्या निमित्ताने राजे ग्रुप दरवर्षी पालखी महोत्सवाचे आयोजन करते.

राजेग्रुप मंडणगड च्यावतीने आयोजीत केलेल्या यंदाच्या पालखी महोत्सवात गावांमधील खेळयांनी बहरादार पालखी नृत्य सादर करुन भावीकांना मंत्रमुग्ध केले. आयोजकांनी सर्व पालख्यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानीका देऊन येथोचीत गौरव केला. पालखी महोत्सव यशस्वी कारणासाठी राजे ग्रुपचे अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. यावेळी रवींद्र पवार, मदन दळवी, सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सदानंद नगरकर, माजी पोलीस उपनिरीक्षक संतोष नगरकर, जितेंद्रसिग गौड, मनाली दळवी, रिद्धी दळवी, रंजन मोरे यांच्यासह  यावेळी  विविध क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवासाठी उपस्थित होते.