वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत बैठक !

संघटनेने वेधलं महावितरणचं लक्ष
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 29, 2023 11:40 AM
views 61  views

सावंतवाडी : तालुक्यातील वीज तारांवरील झाडी तोडणे यांसह गंजलेले वीज खांब बदलण्याबाबत आणि इतर समस्या मार्गी लावण्यासाठी त्वरीत कार्यवाही केली जाईल. तसेच आयटीआय पूर्ण केलेल्यास तात्काळ नियुक्ती देऊन रिक्त वायरमनचा प्रश्नसोडविण्यात येईल अशी ग्वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तनपुरे यांनी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेने तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याबाबत विज उपकेंद्रांतर्गत विभागीय बैठक घेत ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

या समस्या सोडविण्यासाठी संघटनेने महावितरणच्या जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गुरूवारी सावंतवाडीत झालेल्या बैठकीला उपकार्यकारी अभियंता  मिसाळ, सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण, कनिष्ठ अभियंता सुहास परब, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी, तालुका समन्वयक गणेश तथा बाळ बोर्डेकर, कार्यकारणी सदस्य पुंडलिक दळवी, कृष्णा गवस, अनिकेत म्हाडगुत, संतोष तावडे, समीर माधव, सावरवाड सरपंच देवयानी पवार, ग्रामपंचायत सदस्य  रेषा तेली, आनंद राऊळ, रामचंद्र राऊळ आदी उपस्थित होते.