विरोधकांना नितेश राणे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही | वैभववाडीचा विकास फक्त नितेश राणे यांच्यामुळे : नवलराज काळे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 06, 2023 18:42 PM
views 153  views

वैभववाडी : कणकवली विधानसभा मतदारसंघात आ.नितेश राणे यांच्या माध्यमातूनच विकास झाला.उबाठासेनेच्या वतीने आज जिथे कार्यक्रम झाला तो सेल्फी पाॅईंटच काम आ.राणेंनी केलं.त्यामुळे आ.राणेंनी काय केलं म्हणून विचारणा-यांनी वैभववाडीसाठी काय केले याच उत्तर द्यावे.असा सवाल भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी  प्रसिद्ध पत्रकद्वारे केला आहे.

शिवसेना (उबाठा ) गटाच्या वतीने आज वैभववाडीत होऊ दे चर्चा;विचारा प्रश्न या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराविरोधात अभियान राबविण्यात येत आहे .या कार्यक्रमात शिवसेना नेत्यांकडून आ.नितेश राणे यांच्यावर टीका करण्यात आली.या टिकेला श्री काळे यांनी प्रत्युत्तर दिले.शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी आम. राणे यांनी काय केले हे पाहायचं असेल तर सध्या होऊ दे चर्चा ह्या चालू असलेल्या कार्यक्रमच्या व्यासपीठावरून थोडं मागे वळून पाहावे .आमदारांवर  टीका करताना आपण घेत असलेला कार्यक्रम हा त्यांच्या प्रयत्नातून विकसित केलेल्या सेल्फी पॉइंट वरच आहे हे लक्षात असुदे.

राज्यात  साडेसात वर्ष शिवसेना(उबाठा) सत्तेत होती, केंद्रात पाच वर्ष शिवसेना(उबाठा) सत्तेत होती. मग तुम्ही सत्तेत होता तेव्हा का नाही आठवली  युवकांची बेरोजगारी,का नाही केले पेट्रोल डिझेल दर कमी? का नाही दिले धनगर , मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले ? यावेळी छ.शिवाजी महाराज स्मारक,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक का पुर्ण करुन घेऊ शकले नाहीत. शिवसेना सत्तेत असताना अनेक अनैतिक घटना घडल्या त्याबाबत देखील होऊदे चर्चा मध्ये चर्चा कराव्यात.

 कोरोना काळात तुमची सत्ता असताना जिल्ह्यातील शिवसेना उबाठा पदाधिकारी जनतेचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यावेळी आम.राणे जनतेसाठी कोरोना रुग्णांसाठी,कोरोनावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स,नर्स सर्व कर्मचाऱ्यांसाठी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सदस्य रोग नियंत्रण ग्राम कमिटीसाठी अनेक प्रकारच्या मदत करीत होते. या कालावधीत ते देवदूत म्हणून काम करत होते. त्यावेळी हे पदाधिकारी कुठल्या बिळात लपले होते याचे उत्तर होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात मधून मिळू दे जनतेला.जेव्हा आमदा राणे विरोधी पक्षात होते तेव्हा  जेवढी कामे त्यांनी केली तेवढी तरी शिवसेनेने सत्तेत असताना केली का याचे उत्तर द्यावे. आमदार नितेश राणे यांनी काय केले काय नाही केले हे जनतेला आहे ठाऊक शिवसेना उबाठाला जनता मतपेटीतून उत्तर देईल यातील मात्र शंका नाही. निवडणुकीपूर्ती आपली दुकाने उघडणाऱ्या नौटंकीबाज शिवसेना नेत्यांना जनता जागा दाखवेल असा काळे यांनी विश्वास व्यक्त केला.तालुक्यात विविध ठिकाणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ जनतेला मिळत आहे तालुक्यातील नेटवर्क चा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्य यंत्रणेचे प्रश्न असतील अशा सर्व समावेश असलेल्या विकास कामांना आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सत्ताधारी आमदार या नात्याने योग्य न्याय मिळत व यापुढेही योग्य भूमिकेतून जनतेला न्यायदेण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ता कटिबद्ध आहे.

खरं तर होऊ दे चर्चा हा कार्यक्रम फक्त शिवसेना उबाठा  कार्यकर्त्यांपुरतीत मर्यादित होता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला कार्यक्रमात बोलण्याची संधी नव्हतीच. सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारण्याची संधी देत खुली चर्चा ठेवल्यास स्वतःची नाचक्की होईल याची   या गटाला खात्री होती,त्यामुळे होऊ दे चर्चा आपल्या कार्यकर्त्यां सोबत घेऊन आपली राजकीय पोळी भाजू इच्छिणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची राजकीय पोळी शिजली जाणार नाही. अशा शब्दांत काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.