
कणकवली : गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक, तलवारीसह सोने, चांदी आणि लाखोंच्या कॅशसह गोव्यातील आरोपीला सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने वागदे येथे अटक केली आहे. प्रकाश विनायक पाटील ( रा. गोवा) याच्याकडे अवैध शस्त्रसाठा आणि सोने चांदीचे दागिने रोकड असल्याची टीप सिंधुदुर्ग एलसीबीला मिळाली होती.
त्यानुसार एलसीबीच्या पथकाने 12 जुलै रोजी वागदे येथे छापा मारून आरोपी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे रोख लाखोंची रक्कम, गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक नवीन, तलवारी ५, १५ तोळेहून अधिक सोने, साडेचार किलो चांदी तसेच सोने चांदी वितळवण्याची मशीन काटे, तसेच तीन ड्रिल मशीन ,एक वेंटो कार व एक दुचाकी पल्सर चावी सह कटावणी व चोरी करण्याचे साहित्य सापडली आहे.
तो दोन ते तीन महिने कणकवलीत राहत असल्याचा संशय देखील परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. त्याच्याजवळ 30 ते 32 लाखाचा मुद्देमाल सापडला आहे. त्यामुळे आरोपी प्रकाशवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.










