'निर्भय बनो' सभा २१ एप्रिलला कुडाळला...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 19, 2024 12:05 PM
views 482  views

कुडाळ : संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली "निर्भय बनो" सभा रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणात होणार आहे.  ‘निर्भय बनो’  सभेत ज्‍येष्‍ठ विचारवंत ॲड. असीम सरोदे , डॉ. विश्वंभर चौधरी, समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर, ॲड. सुहास सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. या ‘निर्भय बनो’ सभेला जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  ‘निर्भय बनो’ सभेचे संयोजक ॲड. किशोर वरक यांनी केले आहे.