घोडगे - कुडाळ मार्गावरील नवा रस्ता जानेवारीपर्यंत खुला होणार

Edited by: ब्युरो
Published on: July 24, 2023 19:06 PM
views 133  views

कुडाळ : कळसुली दिंडवणे धरण प्रकल्पामुळे कळसुली हुंबरणे या ठिकाणच्या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी येतं आणि त्यामुळे कुडाळ कडावल मार्गे घोडगे जांभवडे भागात जाणाऱ्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. खरं म्हणजे हा रस्ता दिंडवणे धरण प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्रात गेलेला आहे. म्हणजेच धरणातील पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास हा रस्ता कायमस्वरूपी बंद होणार असल्यामुळे त्याला पर्यायी रस्ता म्हणून नव्याने रस्ता मंजूर होऊन कामाला सुरुवात झालेली आहे, जानेवारीपर्यंत जनतेसाठी खुला होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते काका कुडाळकर आणि माजी नगरसेवक अबीद नाईक यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर दिली. 


लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन आज आम्ही माननीय थोरात साहेब ,अधीक्षक अभियंता  दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प विभाग यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी कार्यकारी अभियंता पाटील साहेब पण उपस्थित होते. रस्त्याचे भूसंपादन झालं तरी काही ग्रामस्थांनी रस्ता अडवलेला होता त्या ग्रामस्थांचं समाधान करण्यासाठी पुन्हा रस्त्याची मोजणी करून घ्यावी लागली आणि त्यामुळे कामाला विलंब झाला असे श्री कदम यांनी सांगितलं. परंतु हा रस्ता होणे लवकर होणे फार महत्त्वाचा असल्यामुळे कोणताही अडथळा येत असेल तरी तो दूर करून लवकरात लवकर रस्ता जनतेसाठी खुला व्हावा ही आग्रही मागणी आम्ही ठेवल्यानंतर माननीय थोरात साहेब यांनी सदर रस्ता डांबरीकरण पूर्ण करून पीडब्ल्यूडी ला हस्तांतर करून येणाऱ्या जानेवारी पर्यंत जनतेसाठी खुला करून देण्याचं आश्वासन दिलेल आहे . त्यावेळी आम्ही त्यांना आश्वासित केलं की या रस्त्याबाबत काही अडचणी असतील तर आम्ही त्या सोडवण्यासाठी आपल्या बरोबर राहून प्रयत्न करू असे सांगितले आहे. त्यामुळे बरेच वर्ष रखडलेला हा रस्ता येणाऱ्या जानेवारीपर्यंत जनतेसाठी खुला होईल.