'प्रथमेश गोल्ड' च्या कणकवलीतील नव्या शाखेचा मंगळवारी शुभारंभ

कॉम्प्युटर गोल्ड रेस्टिंग मशीन याशिवाय गोल्ड एक्सचेंज सुविधा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 27, 2023 19:50 PM
views 513  views

कणकवली : प्रथमेश गोल्ड या प्रसिद्ध फर्म च्या कणकवलीमधील नवीन शाखेच्या शुभारंभ सोहळा मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. हा शुभारंभ सोहळा कोल्हापूर येथील प्रसिद्ध गोल्ड व्यावसायिक भरत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कणकवली तालुका दैवज्ञ समाज अध्यक्ष मोहन तळगावकर आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दीपक रामचंद्र बेलवलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या शाखेत कॉम्प्युटर गोल्ड रेस्टिंग मशीनद्वारे सोने चेकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. याशिवाय गोल्ड एक्सचेंज म्हणजेच सोने बदली करून मिळेल.  गोल्ड बुलियन म्हणजेच 24 कॅरेट गोल्ड जीएसटी बिलमध्ये उपलब्ध होईल. या सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन प्रथमेश रिंग अँड हॉलमार्किंग सेंटर, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.  कुडाळ इथंही सुसज्ज फर्म आहे, त्याचसोबत आता 306 पहिला मजला, आरोलकर निवास, फिटनेस बारच्या बाजूला, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग इथं या नव्या शाखेच उद्घाटन होत आहे.