
दोडामार्ग : कुंब्रल येथील राघू लांबर या युवकाला नवहर्ष युवक कला क्रीडा मंडळ शिरवल या मंडळाने आर्थिक मदत करत केली आहे.
कुंब्रल मोईचीवाडी येथील राघु लांबर हा गेल्या 10 महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहे. अचानक झालेल्या आजारामुळे त्याच्या कमरेखालचा भाग पूर्णपणे पक्षाघातग्रस्त (Paralysis) झाला आहे. सध्या त्याच्यावर कोल्हापूर येथे मागील 10 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. दररोज जवळपास 2000 रु इतका औषधोपचार व दवाखान्याचा खर्च होत आहे. घरामध्ये कमावणारे कोणीही नाही. त्याची लहान मुले शिक्षण घेत आहेत आणि वृद्ध आई आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने उपचारासाठी मदतीची नितांत गरज होती. ही सर्व परीस्थिती नवहर्ष युवक कला क्रीडा मंडळ शिरवल बागवाडी यांना समजली. तेव्हा राघु लांबर याला या मंडळाने मदतीचा हात पुढे केला.
मंडळाच्या वतीने राघु लांबर याला रोख रक्कम २००००/- रुपयांची मदत करण्यात आली. या पहिली अनेक वेळा ह्या मंडळाने गरजूंना, आजारग्रस्तांना मदत केलेली आहे. तसेच मंडळाच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात आली की शक्य ती आर्थिक मदत करून राघु लांबर ह्याच्या उपचारासाठी हातभार लावावा.










