
सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विनायक राऊत व कोकण पदवीधर निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार श्री किर यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सहकार्य केले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ आहे. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून अर्चनाताई घारे यांचे नाव निश्चित झाले आहे व या मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढविणार आहे अशी प्रतिक्रिया गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केली.
यावेळी सोबत कोंकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घरे,जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,जिल्हा अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष नाजिर शेख,प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,वैदिक सेल प्रदेश सरचिटणीस विकास मंगल,कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे,वैद्यकीय जिल्हा सरचिटणीस संजय सावंत,अविनाश राणे,अपर्णा पवार,वैभव परब,कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर आदी उपस्थित होते.
माजी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचाच (ऊबाठा)उमेदवार राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. व सावंतवाडी मतदार संघ हा आपला मतदारसंघ असून राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ आहे असेही यावेळी श्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे. खरंतर ज्यावेळी लोकसभा उमेदवार म्हणून शिवसेनेकडून विनायक राऊत उभे होते त्यावेळी त्यांना पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली.येवढेच नाही तर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशक्ती उभी केली होती. त्यामुळे शिवसेनेने ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी असा आग्रह राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असून या मतदारसंघात अर्चना घारे गेली दहा वर्ष पक्षाचे व जनतेचे काम करत आहेत. त्या सक्षम उमेदवार असून त्यांनाही उमेदवारी मिळाली पाहिजे असेही अमित सामंत यांनी शेवटी स्पष्ट केले.
सोबत फोटो
छाया : लवू म्हाडेश्वर