
वैभववाडी : देशभरात डंका गाजत असलेल्या छावा चित्रपट आज (ता.१५)सायंकाळी ७.३०वा. वैभववाडीत मोफत पाहता येणार आहे.येथील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पटांगणावर स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.येथील दत्तकृपा प्रतिष्ठान व माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या माध्यमातून याच आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना कळावा याकरिता येथील दत्तकृपा प्रतिष्ठान एक वेगळा उपक्रम राबवित आहे.संभाजी महाराज यांच्यावरील "छावा "चित्रपट आज स्क्रीनवर मोफत दाखविण्यात येणार आहे.हा कार्यक्रम पुर्णंता मोफत आहे.तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी केलं आहे.