हातिवल्यानंतर सिंधुदुर्गात ओसरगाव टोल नाका सुरू होण्याच्या हालचालीला वेग

कोल्हापूरच्या धर्तीवर निर्णायक लढा सुरू करणार | सिंधुदुर्गवासिय आरपारच्या लढाईसाठी सज्ज
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 12, 2023 10:12 AM
views 324  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही अर्धवट आहे. तरी देखील सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील टोल नाके सुरू करण्यात येत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व स्थानिक रहिवाशांचा  या टोल वसुलीला तीव्र विरोध आहे. परिणामी राजकीय आंदोलन देखील या टोल वसुलीच्या विरोधात करण्यात आली होती. त्यामुळे आता जर हा  टोल सिंधुदुर्ग वासियांच्या माथी मारला गेला तर टोलमुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याची चिन्हे आहेत. तसेच नागरिकांकडून देखील या टोल वसुलीला तीव्र विरोध आहे.


कारण स्थानिक भूधारकांच्या  जमिनीचा मोबदला अजून पर्यंत मिळाला नाही.  तसेच सिंधुदुर्ग वासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका टोल मुक्त कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे आता टोलविरोधी लढण्यासाठी नागरिकच आता आक्रमक होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर निर्णायक लढा सुरू होत असून सिंधुदुर्गवासिय आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत आणि एकच जिद्द..टोल रद्द..  अशी भूमिका आता सिंधुदुर्ग असे घेत आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन तुकडे करणाऱ्या टोल नाक्याला लोकशाही मार्गाने मुळासकट उखडून टाकणार, अशी प्रत्येक नागरिकाची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.