बेपत्ता हळवल येथील तरुण गोव्यात सापडला

Edited by:
Published on: February 23, 2025 12:44 PM
views 427  views

कणकवली : येथील उपजिल्हा रूग्णालयातील वॉर्डबॉय अजय अनंत पवार ( वय ३४ ) हा १९ फेब्रुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर त्याचा भाऊ अक्षय पवार याने कणकवली पोलिसात दिली होती. 

यानंतर इकडे तिकडे शोधाशोध करण्यात आली. मात्र अजय कुठेही सापडून आला नव्हता. सर्वजण चिंतेत पडले होते. अजय सोबत संपर्क करायचा म्हटलं तर फोनही बंद लागत होता. मात्र काही तासांनी अजयचा फोन सुरू झाला. त्यानंतर कुठेतरी विविध प्रश्न उपस्थित होणं बंद झाले. शनिवारी अजय पवार चे लोकेशन हे गोव्यात असल्याचे आढळले. त्यानुसार पुढील कार्यवाही करत अखेर अजय पवार ला शनिवारी दुपारी गोव्यात असलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले व घरी आणण्यात आले.