
सावंतवाडी : सावंतवाडी येथील विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सावंतवाडी यांच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा भव्य “हृदय सत्कार सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप तसेच सावंतवाडी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. निलीमा नाईक, वीणा जाधव, नगरसेवक अजयराव गोंदावळे, अनिल निरवडेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेतच्या अध्यक्षा सौ. ममता जाधव यांनी केलं आहे.










