
बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बांदा आठवडा बाजार गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त गणेशाच्या आराससाठी लागणाऱ्या सजावटी सह भाजी, माटी सामानाने भरगच्च भरला होता. ग्रामपंचायत व पोलिसासांनी केलेल्या नियोजनात आठवडा बाजार भरला होता.
गणेश चतुर्थी पूर्वी सोमवारी बांद्याचा आठवडा बाजार असल्याने बांदा पंचक्रोशी व लगतच्या गोवा राज्यातील अनेक नागरिक ग्राहक मोठा संखेने बाजारात आले होते. चतुर्थीला माटीसाठी लागणारे सामान, तोरणे, लायटिंग, मकर, भाजी, किराणा माल घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. सकाळी ०५ वाजल्यापासून माटी सामान घेऊन येणारे फिरते व्यापारी मोठ्या संखेने बाजारात जंगली सामान घेऊन आले होते. कांगले, कोकम, हरण, तोरिंजन, केळी अशी विविध प्रकारची माटी सामाने बाजारात खरेदी होताना दिसत होते. मात्र माटी सामानाचे दर गगनाला भिडले होते. उतरलेले नारळ तर अक्षरशः १०० ते १५० रुपये पर्यंत विकेल जातं होते.
गोवा राज्यातील लोकांची मोठी वर्दळ
सर्वात मोठी नावाजलेल्या बांदा बाजारात मोठी गर्दी असते ती गोवा राज्यातील लोकांची. बांद्यात प्रत्येक वस्तू कमी दरात मिळते असे म्हणून गोव्यातील लोक मोठ्या प्रमाणात बांद्याच्या बाजारात येतात. गोव्यावाल्यांच्या गाड्या कुठे पार्क करायचा हा मोठा प्रश्न इथल्या पोलिसांना असतो काही गोव्यातील वाहन चालक तर वाहने पार्क करण्यात वरून पोलिसांशी हुज्जत पण घालतात नाईलाजास्तव पोलिसांना त्यांच्यावर दांडात्मक कारवाईही करावी लागते.
ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन सज्ज
गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त बांदा बाजारपेठेत कसं नियोजन करायचं वाहन पार्किंग, पोलीस बंदोबस्त यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी बांदेश्वर मंदिर, खेमराज हायस्कूल रस्ता मुंबई गोवा हायवे पुलाखाली चारचाकी वाहने पार्क करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. चारचाकी वाहने मेन बाजारत जाऊ नये यासाठी पोलीसांनी बॅरिकेट्स ठिकठिकाणी लावली होती.
पाऊस नसल्याने समाधान
चार दिवसांपूर्वी मुसळधार पडणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. काल दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यावर बाजरासाठी आलेल्या लोकांना हवातसा बाजार घेता आला. पावसाचे सावट नसल्याने लोकांनी समाधानकारक गणेश चतुर्थीचा बाजार घेतला.