माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली

आमदार निलेश राणेंच्या लढ्याला यश
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 29, 2025 11:50 AM
views 73  views

कुडाळ : गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून आज आकारीपड म्हणून घोषित झालेल्या जमिनींच्या संदर्भात महसूलविभागाकडून महत्वपूर्ण शासननिर्णय घोषित करण्यात आला आहे. 

यात शेतकरी अथवा त्यांच्या वरसाने आकारीपड जमिनींच्या चालू वर्षाच्या पाच टक्के रक्कम शासनजमा केल्यास हस्थांतरणार निर्बंध या अटीवर त्यांना या जमिनी परत करण्यात येतील असा निर्णय दिला असून यामुळे माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूलराज्यमंत्री योगेश कदम यांच्याजवळ सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. 

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार निलेश राणे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. आमदार राणे यांच्या अथक प्रयत्नांना व लढ्याला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. या निर्णयाचा फायदा माणगाव खोऱ्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार असून, जमिनींच्या मालकी हक्काबाबतची अनिश्चितता आता दूर झाली आहे.