जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश | सर्व तालुक्यांमध्ये आढावा सभा
Edited by:
Published on: February 14, 2025 20:21 PM
views 88  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा सभा घेणार आहेत.

१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कणकवली तर दुपारी ३ वाजता मालवण तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामाचा ते आढावा घेतील. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तर दुपारी ३ वाजता वेंगुर्ले तालुक्याचा आढावा घेणार आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी तालुक्याचा आढावा घेतील तर दुपारी ३ वाजता देवगड तालुक्याचा आढावा घेणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुक्याचा व दुपारी ३ वाजता दोडामार्ग तालुक्याचा आढावा घेणार आहे.