थकीत बिलासाठी शिक्षक क्रांती संघटनेचे उपोषण

Edited by: मनोज पवार
Published on: July 19, 2024 12:48 PM
views 328  views

खेड :  शिक्षक क्रांती संघटनेच्या वतीने उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष  महेंद्र  जाधव आणि सहकारी यांनी माध्य, उच्च, माध्य, अनुदानित व अंषत: अनुदानित शिक्षकांची  सन 2019-20 ते 2023-24 पर्यंत अनेक थकीत वेतन बिल, मेडीकल बिल, भविष्य निर्वाह निधीची, वरिष्ठ वेतन श्रेणी ची अनेक बिले कार्यालयातील अधिका-यांंच्या निष्काळजीपणाने व अयोग्य मानसिकतेच्या वृत्तीमुळे गेल्या कित्येक वर्षापासुनची  थकीत बिलांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शिक्षक क्रांती संघटना, आणि अंषत: अनुदानित  कृती समितीच्या अनेक कार्येकर्ताच्या समवेत काल 18 जुलैला उपोषण सकाळी सुरू केले होते.

या वेळी कार्यालयातील जबाबदार असलेने वेतन अधिक्षक  पवार व  श्री. मोमीन  हे उपषोणाला घाबरून रजेवर गेलेत ही गंभीर बाब पोलिस खात्यांच्या उपस्थित असलेल्या अधिकारी यांच्या लक्षात आणुन दिली. त्यांनी सदर खात्यांच्या वरीष्ठ अधिका-यांच्या याबाबत माहीती दिली असता. भविष्य निर्वाह खात्याचे अधिक्षक श्री. चुंबाळकर  हे दुपारी 3.30 वाजता चर्चेसाठी  शासनाच्या वतीने उपस्थित झाले.

या वेळी  शिक्षकांच्या थकीत बिला संदर्भात राज्यातील एकमेव वेतन अधिक्षक कार्यालय असेल त्या विरूध्द् आम्हांला उपोषणाला बसावे लागले. ही बाब आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला  षो शोभणारी  नाही. कारण आतापर्यंत अनेक आंदोलन हे शिक्षणाधिकारी ,उपसंचालक कार्यालय विरूध्द् आंदोलन होत होती, मात्र शिक्षकांच्या  थकीत बिलाबाबतीत प्रश्न खुप गंभीर झाल्यामुळे आपल्या कार्यालयात उपोषणाला बसण्याची ही राज्यातील एकमेव घटना असावी.

या विषयांबाबत पोलिस प्रशासनाच्या वतीने श्री. सावंत व सहकारी यांनी मध्यस्ती करून आणि 20 जुलै पर्यंत जमाव बंदी आदेश   रत्नागिरी जिल्ह्यात लागु असल्याने व अतीवृष्टी मुळे रत्नागिरी जिल्हाला दिलेला रेड अलर्ट आणि वेतन अधिक्षक  यांनी दिलेल्या लिखीत विनंती व वचनामुळे उपोषण 15 ऑगस्ट 2024 पर्यंत स्थगित करण्यात आले आल्याचे महेंद्र जाधव यांनी संघटनेच्या वतीने घोषित केले. 

जर या बिला बाबत  15 ऑगस्ट 2024 पर्यंत योग्य ती कार्यवाही करून षिक्षकांच्या शिक्षकांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत तर  15 ऑगस्ट 2024 पासुन   हे उपोषण पुन्हा सुरू केले जाईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. या उपोषणाला शिक्षक क्रांती संघटनेचे कोकण अध्यक्ष रमेश जाधव,जिल्हा अध्यक्ष आनंद त्रिपाठी , उत्तर विभाग अध्यक्ष महेंद्र जाधव कार्यवाह राहुल सप्रे, श्री.  नानगुरे  व अंशत: अनुदानित कृती समितीचे अभिजीत सुर्वे, सहस्त्रबुध्दे, राजषिर्के मॅडम आणि इतर शिक्षक बंधु भगींनी उपस्थित होत्या. या साठी शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष  सुधीर घागस आणि  कोकण पदवीधर आमदार  निरंजन डावखरे  यांचे  मार्गदर्शन लाभले.