ऐतिहासिक घोडेबाव ठिकाणचा कलादालन म्हणून पर्यटक विकास व्हावा !

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रभाकर सावंत यांची मागणी
Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 03, 2023 16:17 PM
views 84  views

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व ऐतिहासिक ठिकाण असलेल्या घोडेबाव या ठिकाणाचा ऐतिहासिक कलादालन म्हणून विकास करावा व येथील पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

     काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे  विश्रामगृह  असलेले हे घोडेबाव ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे होते. या विश्रामगृहाची वास्तू सध्या विना वापर असून या विभागातीचा क्वचितच कार्यालयीन उपयोग केला जातो. या वास्तूच्या दुरुस्तीचा प्रश्नही प्रलंबित असून हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आहे. हे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे वेंगरला नगरपंचायतीने केलेल्या कलादालनाच्या धरतीवर या ठिकाणीही ऐतिहासिक घोडेबाव कलादालन विकसित करावे  येथील पर्यटनाला आणखी चालना मिळेल व कुडाळ शहराच्या विकासालाही हातभार लागेल याकडेही प्रभाकर सावंत यांनी यादी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहेत.

          शिवछत्रपतींचे ऐतिहासिक वारसा असलेले घोडेगाव ठिकाण एक ऐतिहासिक कलादालन म्हणून विकसित व्हावे असे कुडाळ वासिय काही नागरिकांची मागणी होती. हे कलादालन विकसित करून एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात द्यावे अशी मागणी ही या निवेदनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नमूद केली आहे.