शेखर निकम यांच्या कामावर मोहर

ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत सामूहिक प्रवेश
Edited by: मनोज पवार
Published on: August 31, 2025 12:45 PM
views 76  views

संगमेश्वर : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित पाऊल टाकत फणसवणे गुरववाडी, गराटेवाडी, वणेवाडी, बालदेवाडी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजितदादा पवार गट) सामूहिक प्रवेश केला.

गेल्या पाच वर्षांपासून आमदार शेखर निकम यांनी शांत, संयमी आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीतून गावोगाव भरीव विकासकामे केली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व इतर पायाभूत सुविधांमुळे परिसरात विकासाचा नवा ध्यास निर्माण झाला असून, त्याचा प्रत्यय या प्रवेश सोहळ्यात आला.

या प्रसंगी आमदार शेखर निकम म्हणाले, “प्रत्येक गावाचा विकास हीच आमची प्राथमिकता आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने टप्याटप्याने योजनाबद्ध पद्धतीने कामे पूर्ण केली जातील.”

सामूहिक प्रवेशावेळी ग्रामस्थांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये गावकर गणपत गुरव, प्रकाश काजवे (अध्यक्ष-मुंबई), दिलीप कदम (सचिव), मोहन गुरव (उपसरपंच), विजय गुरव (सचिव-मुंबई), पुरुषोत्तम वणे (कार्याध्यक्ष स्थानिक), रविंद्र गराटे (मुंबई), वामन गुरव, बापू गुरव, शिवशंकर वणे, अनंत गुरव, वसंत वणे, राजन गराटे, गणपत गराटे, मोहन बालदे, सिद्धार्थ कदम, सुरेश गुरव, तसेच ग्रामपंचायत सदस्य विनित गराटे, माधुरी गुरव, वणे, दिनेश वणे, दिनेश बालदे, अश्विनी बालदे आदींचा समावेश होता.

हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षबदल नव्हे, तर गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी नमूद केले.