
कणकवली : कणकवली\सह जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककरता जाहीर प्रचार आज रात्री १० वाजता संपणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना ग्रामपंचायत निवडणुकीकरता गावोगावी प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील या निवडणूक प्रचारात उडी घेतल्याने रंगत अजूनच वाढली आहे. या निवडणुकीकरिताचा जाहीर प्रचार आज शुक्रवारी रात्री १० वाजता संपणार आहे. व त्यानंतर कंदील प्रचाराला जोर येणार आहे.