
सावंतवाडी : योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई व सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी संचलित सेवा सहयोग प्रतिष्ठान सिंधुमित्र यांच्या माध्यमातून "ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक" लोकार्पण सोहळ्याच आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. राजवाडा, सावंतवाडी येथे हा सोहळा पार पडणार असून उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने केलं आहे.
योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई व सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील फणसवडे, केसरी, दाणोली, पारपोली, देवसू, ओवळीये, आंबेगाव, कुणकेरी या दुर्गम भागांमध्ये डॉक्टरांमार्फत मोफत प्राथमिक वैद्यकिय सेवा देण्यात येणार आहे. या फिरत्या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. राजवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. उद्घाट म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहूणे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले (सावंतवाडी संस्थान) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर असणार आहेत. या लोकोपयोगी उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन फिरते वैद्यकीय पथक, प्रकल्प प्रमुख दीपक गांवकर, योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई विश्वस्त सीए विवेक दोषी, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी केले आहे.