
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. वारंवार पाठपुरावा करुन तसेच निवेदन देऊनही घरकुलाच्या प्रश्नाची दखल घेतल्या जात नव्हती. परंतु आज झालेल्या 'जनता दरबार' मध्ये हा प्रश्न मार्गी लावला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून सुमारे ७० कातकरी समाज बांधवांना घरासाठी ओसरगांव येथील जमीन देऊन त्यांच्या घराचा प्रश्न कायमचा सोडवला आहे.