सिंधुदुर्गातील पहिल्या 'चॉकलेट फॅक्टरी'च शानदार शुभारंभ !

माजी आम. राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन
Edited by: विनायक गांवस
Published on: December 25, 2022 19:32 PM
views 414  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध श्री गणेश फोटो स्टुडीओचे मालक सुनील कोरगांवकर यांच्या पुढाकारातून व त्यांच्या सुनबाई ज्योती सुरज कोरगांवकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गातील पहिली ''चॉकलेट फॅक्टरी'' सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे सुरु झाली आहे. माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते या चॉकलेट फॅक्टरीचा शानदार शुभारंभ पार पडला.


श्री गणेश चोकोबाईट्स् चॉकलेट फॅक्टरीच्या माध्यमातून विविध प्रकारची चॉकलेट, पेस्ट्रीस, केक, आईस्क्रिम, तंदूर चहाची चव एकाच छताखाली चाखता येणार आहे. आकर्षक अशी चॉकलेट गिफ्ट, फेस्टिव्हल कलेक्शन, चॉकलेट बुके आदी विविध व्हरायटीस देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. श्री गणेश फोटो स्टुडीओच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली कलर मशीन आणल्यानंतर आता जिल्ह्यातील पहिली ''चॉकलेट फॅक्टरी'' सावंतवाडी तालुक्यात उभारली आहे. मळगाव येथे हि फॅक्टरी सुरु झाली आहे. गणेश फोटो स्टुडीओचे मालक सुनील कोरगांवकर यांच्या सुनबाई ज्योती सुरज कोरगांवकर यांच्या संकल्पनेतून हि ''चॉकलेट फॅक्टरी'' दक्षिण कोकणचं प्रती पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊली मंदिर मार्गावर कुंभार्ली-मळगाव,मुंबई-गोवा हायवे लगत सुरु झाली आहे. या 'चॉकलेट फॅक्टरी'मुळे परिसरातील महिलांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध झालीय.


या ठिकाणी मिक्स ड्रायफ्रुट्स, प्लेन चॉकलेट, ड्रायफुट कोटिंग चॉकलेट, कस्टमाईज चॉकलेट, फिलिंग चॉकलेट, फेस्टिव्हल कलेक्शन, किड्स कलेक्शन, स्पेशल चॉकलेट बुकेसह विविध प्रकारची चविष्ट चॉकलेट उपलब्ध आहेत. तर केक व पेस्ट्रीसमध्ये आईस केक, पेस्ट्रीस केक,रोल केक, जार केक, फ्लेवर्ड केक, चॉकलेट केक आदि उपलब्ध असून ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळणार आहेत. याचबरोबर काजू, बदाम, खजूर 

कोकम, लेमन, मॅगो सरबतसह ''कोकणी मेवा'' देखील याठिकाणी उपलब्ध आहे. श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक, ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊससह 

''विन तंदूर चहाची'' डिफरंट व युनिक टेस्ट चाखता येणार असून मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांच श्री गणेश चोकोबाईट्स् तोंड गोड करणार आहे अशा भावना ज्योती कोरगांवकर यांनी व्यक्त केल्या.


 भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते या फर्मच उद्घाटन करण्यात आले.‌ यावेळी राजन तेली यांनी कोरगावकर कुटुंबियांच कौतुक करत शुभेच्छा दिल्या. महिलांनी घेतलेल्या पुढाकारासह आत्मनिर्भर बनण्यासाठी टाकलेलं पुढचं पाऊल असल्याच राजन तेली म्हणाले. दरम्यान, चॉकलेट फॅक्टरीला भेट द्या अन चविष्ट चॉकलेटची चव चाखा अस आवाहन श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरीच्या माध्यमातून सुनील कोरगांवकर,स्मिता कोरगांवकर,सुरज कोरगांवकर, ज्योती कोरगांवकर यांनी केल आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कोरगांवकर कुटुंबियांच्या हितचिंतकांनी चॉकलेट फॅक्टरीला भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. 


याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सुनील कोरगांवकर,स्मिता कोरगांवकर,सुरज कोरगांवकर, ज्योती कोरगांवकर, प्रसाद सातार्डेकर, महेश देऊलकर, भास्कर देऊलकर, अनु देऊलकर, 

रविंद्र प्रभुदेसाई, कोरगांवकर, देऊलकर कुटुंबिय उपस्थित होते.