
कणकवली : आंबा काजू बागायतदारांची सरकारने फसवणूक केली. हेक्टरी आंब्यासाठी ५ लाखांची मागणी असताना विमा भरलेल्यांना हेक्टरी ४२ हजार व न भरलेल्यांना २२ हजार भरपाई जाहिर करून सरकार, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी फसवणूक केली आहे. प्रत्येक झाडाला केवळ २२० रुपये भरपाई जाहिर करून सरकारने बागायतदारांची चेष्टा केली आहे, अशी टिका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, आंबा, काजू बागायतदारांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. बागायतदारांच्या मोर्चावेळी पालकमंत्र्यांनी सामोरे जात भरपाईबाबत चांगला निर्णय होईल, असे सांगितले. पण सरकार, मुख्यमंत्री व पालकमंत्री बागायतदारांना भरपाई देण्यास अपयशी ठरले आहेत. सरकारने जाहिर केलेल्या भरपाईत कर्जावरील व्याजही भरता येणार नाही. तर दुसरीकडे साडेचार कोटी खर्च करून एआयच्या मतदीने काय केले जाणार? हा सारा प्रकार म्हणजे शेतकरी बागायतदारांची फसवणूक आहे.
आंबा काजू बागायतदारांची सरकारने फसवणूक केली. हेक्टरी आंब्यासाठी ५ लाखांची मागणी असताना विमा भरलेल्यांना हेक्टरी ४२ हजार व न भरलेल्यांना २२ हजार भरपाई जाहिर करून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अधिवेशनात चर्चा झाली नाही आणि मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनीही कोणताही विषय काढलेला नाही. एवढ्या वर्षात पहिल्यांदा हवामान, पाऊस असे संकट आलेले असताना जगप्रसिद्ध असलेल्या देवगड हापूसला भरपाई देण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, असेही उपरकर म्हणाले.
आंब्याच्या एका कलामासाठी किमान हजार ते दिड हजारची फवारणी करावी लागते. त्यासाठी एका जोडप्याला महिन्याला १५ हजार किमान पगार द्यावा लागतो. सहा महिने फवारणी करत ते जोपासावे लागते. हे नुकसान भरून न येणारे आहे. मात्र, झाडाला २२० भरपाई जाहिर करून सरकारने बागायतदारांची चेष्टा केली आहे. त्यामुळे याबाबत बागायतदार जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठींबा असेल असेही श्री. उपरकर म्हणाले.
सरकारने काजू बागायतदारांनाही वाऱ्यावर सोडले आहे. केवळ २५ ते ३० टक्के काजू पिक आलेले असून त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसात आंबा, काजूसहीत, जांभूळ, रतांबा आदी फळपिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकरी कृषी योजना जाहिर करत असले तरीही नव उद्योजकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. सरकार फसव्या घोषणा करत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.












