सावंतवाडीत ७ एप्रिलपासून कै. जयानंद मठकर व्याख्यानमाला

स्मृती पुरस्कारही जाहीर
Edited by: विनायक गांवस
Published on: March 28, 2026 15:17 PM
views 23  views

सावंतवाडी : येथील श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ७ एप्रिल ते शनिवार, ११ एप्रिल २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.०० वाजता श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात हे वैचारिक संमेलन पार पडणार आहे.

व्याख्यानमालेचे उद्घाटन ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता कोल्हापूरचे सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव करण्यात येणार आहे. कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार डॉ. सुरेंद्र मोहन ओणी (संस्थापक, मातृमंदिर, ओणी-राजापूर),  प्राचार्य अल्ताफ खान उत्कृष्ट वाचक पुरस्कार श्री. मधुकर मातोंडकर, प्रा. पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार जयंत बरेगार, प्रा. मिलिंद भोसले स्मृती प्रित्यर्थ ग्रंथालय वाचक पुरस्कार सौ. राजश्री टिपणीस यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या सोहळ्याला बांदा येथील डॉ. रुपेश पाटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या मालेत पुण्यासह कोल्हापूर आणि अहिल्यानगर येथील नामवंत वक्ते विविध विषयांवर विचार मांडणार आहेत. 

बुधवार ८ एप्रिल २०२६ रोजी व्याख्याता - मेधा सामंत-पुरव, पुणे विषय - महिला सक्षमीकरणाची पन्नास वर्षे अध्यक्ष - वंदना करंबेळकर, सावंतवाडी, गुरुवार ९ एप्रिल २०२६ व्याख्याता - सुभाष वारे, पुणे विषय - संविधानः आपल्या जगण्याचा आधार अध्यक्ष - वीरधवल परब, वेंगुर्ले, शुक्रवार १० एप्रिल २०२६ व्याख्याता- डॉ. व्ही. एन. शिंदे, कोल्हापूर विषय - जंगलप्रदूषण मानवाला संपवेल अध्यक्ष - डॉ. गोविंद काजरेकर, तळवडे, शनिवार ११ एप्रिल २०२६ व्याख्याता - आनंद शितोळे, अहिल्यानगर विषय - आमच्या धडावर आमचेच डोके अध्यक्ष - सतीश लळीत, ओरोस असणार आहेत. व्याख्यानमाला कालावधीत ७ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत ग्रंथालयाच्या नियतकालिक विभागाची वेळ सकाळी ९.०० ते १२.३० व दुपारी ४.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यत राहील याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. व्याख्यानमालेच्या कालावधीत ग्रंथालयाच्या नियतकालिक विभागाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. वाचकांसाठी हा विभाग सकाळी ९.०० ते १२.३० आणि दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेतच खुला राहील, याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, उपकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, कार्यवाह रमेश बोंद्रे, उपाध्यक्ष उमाकांत वारंग आणि संचालक मंडळाने केले आहे. सावंतवाडीतील जास्तीत जास्त रसिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.