कोल्हा पडला विहिरीत

वनविभागाने दिले जीवदान
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 05, 2024 12:38 PM
views 384  views

देवगड :  शिकारीच्या शोधत वस्तीत आलेला कोल्हा कोरड्या विहिरीत पडला त्या कोल्ह्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतून बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. भक्षाच्या शोधत असलेला कोल्हा देवगड येथील समर्थ प्लाझा सोसायटीच्या कोरड्या व विनावापर असलेल्या विहिरीत पडलेला या कोल्ह्याला वनविभागाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. 

 देवगड येथील समर्थ प्लाझा सोसायटीच्या विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती पोलीस हवालदार प्राची धोपटे यांना मिळाली होती. त्यानुसार त्या कोल्ह्याला जीवदान देण्यासाठी उपवनसंरक्षक नवकिशेर रेड्डी व सुनील लाड (सहाय्यक वनरक्षक वनजीव) व राजेंद्र घुनकीकर (वनक्षेत्रपाल) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण परीट (वनपाल देवगड) व रामदास घुगे (वनरक्षक), आप्पासाहेब राठोड (वनरक्षक) यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी विहिरीत पाणी नव्हते. विहीर पूर्णतः कोरडी व विनावापर होती. त्यामध्ये कचरा साचलेला होता. 

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. ग्रामस्थ स्वप्नील कुबल, योगेश देवगडकर, जलाल डोंगरकर या स्थानिक ग्रामस्थ्यांच्या मदतीने व जाळीच्या सहाय्याने विहिरीत पडलेला कोल्ह्याला विहिरीतून यशस्वीरित्या व सुखरूप बाहेर काढन्यास वनविभागाला यश मिळाले.