
सावंतवाडी : नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट असल्यानं गणेशचतुर्थीतीतील स्थानिक व्यापार बैठक व्यवस्था, मुख्य बाजारपेठ नियोजन व पार्किंग नियोजनाबाबत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी लक्ष वेधले आहे. त्याबाबतची मागणी बबन साळगावकर यांनी केली आहे.
कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवासाठी देश विदेशातून मुंबई पुणे तसेच देशातील अन्य भागातून गणपती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरगुती गणपती गणेशोत्सवासाठी नागरिक येत असतात. हा कोकणवास यांचा महत्त्वाचा उत्सव, या उत्सवाची पूर्वतयारी सावंतवाडी नगरपरिषद पूर्वीपासून करत आलेली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्य बाजारपेठेमध्ये स्थानिक व्यावसायिकांना बसण्याची नियोजन केले जाते. ते नियोजन गांधी चौक भांगले पेट्रोल पंप ते जयप्रकाश चौक तसेच वेलनेस ते आठ पेट्रोल पंप संपूर्ण मार्केटच्या भोवती बस बसण्याची व्यवस्था होत असते. ती व्यवस्था तशीच करावी, शहरातील पार्किंगचे नियोजन पूर्वी अनेक वेळा बैठका घेऊन केलेले आहे. त्याप्रमाणेच करण्यात यावी. याबाबतची पूर्ण माहिती वृक्ष प्राधिकरण अधिकारी गजानन परब यांच्याकडे आहे त्याप्रमाणे शहरांमध्ये बोर्ड लावून नियोजन करावे.
गणपती विसर्जनासाठी विशेष नियोजन करण्यात येते तसेच तराफे तलावातील होड्या दुरुस्त करण्यात याव्यात त्याचं नियोजन करण्यात यावे. गणपती विसर्जनाच्या ठिकाणी विशेष लाईट लावण्यात यावी इलेक्ट्रिक विभागाचे प्रदीप सावरवाडकर यांच्याकडे याबाबत माहिती आहे तसेच आपल्या अध्यक्षतेखाली सर्व कर्म कर्मचाऱ्यांच्या बैठक घेऊन शहरातील पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे नियोजन करण्यात यावे अशी विनंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना केली आहे. मुख्याधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच गणेशोत्सव होत असल्यानं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या या सुचना प्रशासनाला योग्य नियोजन करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत.