कोलगाव ग्रा. पं.तीच डिजिटल पाऊल ; राज्यातल्या पहिल्या मोबाईल अॅॅपचं पालकमंत्र्यांच्या हस्ते शानदार लोकार्पण

Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 20:35 PM
views 256  views

सावंतवाडी : महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल अॅप तयार करणारी पहिली ग्रामपंचायत म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव ग्रामपंचायतीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून हे अॅप तयार करण्यात आले आहे. कोलगावचे सुपुत्र, भाजपचे युवा नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश सारंग यांनी यासाठी पुढाकार घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी येथील गांधी चौकात कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल अॅपचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.


डिजीटल इंडियाची संकल्पना स्थानिकांपर्यंत पोहचण्यासाठी ही संकल्पना आम्ही मांडली. अनेक अडचणींवर मात करत राज्यातील व जिल्ह्यातील ही पहिली मोबाईल अॅप तयार करणारी पहिली ग्रामपंचायत कोलगाव ठरली.‌ १२ प्रकारचे दाखले मिळवू शकतो. घरपट्टी पाणीपट्टी यावरून भरू शकतो.‌ पारदर्शक कारभार यातून होणार आहे असं मत सरपंच संतोष राऊळ यांनी व्यक्त केले.

यानंतर कोकणसाद LIVE ने तयार केलेल्या मोबाईल अॅॅपबद्दल माहिती देणाऱ्या चित्रफितीचं पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. 

यावेळी कोलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांस भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोंसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, अशोक सावंत, रणजीत देसाई, राजन गिरप, प्रमोद कामत, प्रभाकर सावंत, महेश सारंग, संजू परब, संध्या तेरसे, प्रज्ञा ढवण, मोहिनी मडगावकर, बाळु देसाई, मनोज नाईक, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.