
सावंतवाडी : महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल ॲप तयार करणारी पहिली ग्रामपंचायत म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव ग्रामपंचायतीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून ही अप तयार करण्यात आले आहे. कोलगावचे सुपुत्र, भाजपचे युवा नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश सारंग यांनी यासाठी पुढाकार घेतला.
कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल ॲपचा लोकार्पण सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी 19 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी इथल्या गांधी चौकात होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कोलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव तसेच सर्व सदस्य आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.