
खरेदी विक्री संघ निवडणूकीत भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना यांच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पहिली युती ही कोकणात झाली, 'गुलाल' देखील कोकणातून उधळणार असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांची रणनीती विजयाची आहे. कॉग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेच्या तीन माकडांना मतदान करूंन फायदा होणार नाही, हे मतदारांना ठावूक आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला.