
कणकवली : 'हत्ती घूस रेडा गेंडा ' या नाटकाचा शुभारंभ २ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याहस्ते झाला. आचरेकर प्रतिष्ठान इथं झाला. महात्मा गांधी अणि लाल बहादूर शास्त्री या दोन महान महापुरुषांच्या जयंती दिनी हत्ती
घूस रेडा गेंडा या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग आचरेकर प्रतिष्ठान तर्फे कणकवली येथे संपन्न झाला. पहिलाचा शुभारंभ प्रयोग हाऊसफुल्ल झाला याशिवाय जवळपास 100 पेक्षा अधिक रसिक प्रेक्षकांना परत जावे लागले. ह्या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे रसिक प्रेक्षकांना एक तास 40 मिनिटे खिळवून ठेवणारा हा प्रयोग आहे.
प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या विचारला व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करते. त्याच्या विचाराला हत्तीचे बळ देते अशी अजरामर कलाकृती आहे. या नाटकाची जोरदार चर्चा सध्या कणकवली येथे सुरू आहे ही बाब आचरेकर प्रतिष्ठान च्या दृष्टीने खूप कौतुकाची अणि अभिमानाची सुद्धा आहे. हे नाटक प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे असे आहे असे म्हंटले तर अजिबात वावगे होणार नाही. मी एक रसिक आहे शिवाय एक सृजनशील अणि संवेदनशील अधिकारी आहे. मी सांस्कृतिक चळवळी मुळेच एक संवेदनशील अधिकारी घडलो आहे हे मी विनम्रपणे सांगू इच्छितो मी आज या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग एक रसिक प्रेक्षक म्हणून पाहण्यासाठी गेलो तर मला आचरेकर प्रतिष्ठान यांनी मला उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून सन्मानित केले शिवाय बोलण्याची संधी सुद्धा दिली हे मी माझे भाग्य समजतो. मी यासाठी आचरेकर प्रतिष्ठानचा अतिशय आभारी अणि ऋणी असल्याची भावना कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.