
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत माठेवाडा येथील प्रसिद्ध आत्मेश्वर मंदिर येथील आत्मेश्वर तळी येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत या मोहिमेस प्रारंभ झाला.
आत्मेश्वर मंदिर हे सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून त्याठिकाणी पर्यटक भेट देत असतात. यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम सफाई कर्मचारी यांच्या मार्फत राबविण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक देवा टेमकर यांच्यासह न.प. कर्मचारी उपस्थित होते.










