डिगसच्या काळंबा देवीची उद्या जत्रा..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 10, 2023 14:06 PM
views 147  views

कुडाळ : डिगस वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणा-या म्हणून ख्याती असलेल्या डिगस (ता. कुडाळ) गावची ग्रामदेवता श्री देवी काळंबा मंदीरात वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ रोजी साजरा होणार आहे.

डिगस या गावची ग्रामदेवता श्री काळंबा देवी डिगस वासियांचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. सोमवारी या मंदीरात देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने सकाळी श्रींची विधिवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, दिवसभर श्रींचे दर्शन, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, ११ वाजता पालखी सोहळा त्यानंतर रात्री १२ वा. आजगांवकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी या जत्रोत्सवासाठी उपस्थित राहून श्रींचे दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन डिगस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.