नुतन जिल्हाधिकाऱ्यांचं जिल्हा वकील संघटनेने केलं स्वागत

Edited by: विनायक गावस
Published on: August 29, 2023 14:07 PM
views 161  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गचे नुतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा वकील संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड परिमल नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी यांचं स्वागत करण्यात आले.

यावेळी सचिव अँड. यतिश खानोलकर, अँड. राजेंद्र रावराणे, अँड. अमोल सामंत, अँड. राजु परुळेकर, उपाध्यक्ष अँड. नीता गावडे, अँड. पी. डी. देसाई, अँड. शिंपूगडे, अँड. प्रसन्ना सावंत,अँड. वारंग, अँड. अविनाश परब, अँड.अक्षय चिंदरकर आदी वकील वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी वकील वर्गाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आली.