पोलीस पाटील भरती अर्जासाठी मुदत वाढावी

मनसेच्या संदेश सावंत यांची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: December 05, 2023 15:39 PM
views 120  views

सावंतवाडी : पोलीस पाटील भरती अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ डिसेंबर २०२३ मुदत वाढवून मिळावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदेश सावंत यांनी केली आहे.

तालुक्यातील काही गावात पोलीस पाटील पद रिक्त असल्याने त्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज भरणार आहेत त्यांना अर्ज भरण्याची अंतिम तारीख ०६ डिसेंबर २०२३ ही देण्यात आली. या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे बहुसंख्य उमेदवारांची तयार झाली नसल्याने त्यांना या भरतीपासून मुकावे लागणार आहे ESW सर्टिफिकेट, पोलीस पडताळणी सर्टिफिकेट , उत्पन्न दाखला यासारखी कागदपत्रे मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केले असून काहीना ती अजून मिळाली नाहीत .तरी या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस पाटील पदाच्या अर्ज भरण्याची अंतिम मुदत कमीत कमी ७ दिवस वाढून मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदेश सावंत यांनी प्रांताधिकऱ्यांकडे केली आहे.