कणकवली आचरा रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवले..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 13, 2023 11:53 AM
views 198  views

कणकवली : कणकवली आचरा रस्त्यावरील पटवर्धन चौक नजिक जुन्या पोस्ट ऑफिस समोर भयानक  खड्डे पडले होते. या खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होत होते. अखेर या रस्त्यावरील धोकादायक खड्डे अखेर सार्वजनिक बांधकामाने सिमेंट काँक्रीटने बुजवले आहेत. त्याबद्दल कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

कणकवली आचरा रस्त्यावरील पावसाचे पाणी येवून जुन्या पोस्ट ऑफिस समोर धोकादायक खड्डे पडले होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. काही दिवसापूर्वी या खड्ड्यामुळे माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर त्याची दखल घेऊन शनिवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे खड्डे काँक्रिटीकरणाने बुजवून रस्ता सुस्थितीत केला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.