LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील शाळांत मुलांसाठी पक्के शौचालय बांधणार

जिल्हा परिषद कार्यालयांत सीसीटीव्ही लागणार : सीईओ रवींद्र खेबुडकर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 21:28 PM
views 36  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शाळांमधील शौचालयांची दयनीय अवस्था पाहता जि.प.ने मुला-मुलींसाठी पक्के व कायमस्वरूपी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही शौचालये उभारताना प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

यासोबतच जि.प.च्या प्रत्येक कार्यालयात व्हिडीओ रेकॉर्डिंगसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग एक महिनाभर जतन केले जाईल. यासाठी शासनाकडे परवानगीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, जि.प. बांधकाम विभागात अलीकडे झालेल्या खोट्या सही प्रकरणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सीईओंची भेट घेतली. त्यावेळी सीईओंनी शिष्टमंडळाला ही माहिती दिली.