
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाची केवळ बाहेरून रंगरंगोटी आणि आतून पोकळ अशी अवस्था आहे. सावंतवाडीत रेल्वे स्थानकाला सावंतवाडी टर्मिनसचा दर्जा मिळूनही अद्यापही इथे अनेक रेल्वे गाड्यांना थांबा का दिला जात नाही ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळाला आहे. पण, अद्याप येथे अनेक रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात नाही आहे. तसेच प्रवाशांसाठी येथे वेटींग रूम देखील उपलब्ध नसून प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध नाहीत. सावंतवाडी येथून सुटणारी तुतारी ही गाडी देखील प्लॅटफॉर्म 2 वर लागत असल्याने वयोवृध्द प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आपण लक्ष वेधणार असून या सर्व समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करणार असल्याची माहिती श्री. राऊळ यांनी यावेळी दिली आहे.