रिक्त पदे आणि कामाचा प्रंचड ताण | देवगड ग्रामीण रुग्णालयातील अधी परिचारिकांचं तीन ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन

अशा परिस्थितीत काम करण्यास ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. रघुनाथ जोशी यांचीही असमर्थता
Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 28, 2023 16:45 PM
views 224  views

देवगड : वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विटकर व डॉक्टर जोशी यांनी  पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती नुसार, देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका पदे रिक्त असल्याने, सध्या या रुग्णालयाचा कारभार केवळ तीन अधिक परिचारिकांवर सुरू आहे. मात्र, रात्रंदिवस काम करावे लागत आहे. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या रोशालाही तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आपण दोन ऑक्टोबर पर्यंत जर रिक्त असलेली सात अधिपरिचारिका पदे भरली नाहीत, तर ३ ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन करीत असल्याची नोटीस देवगड ग्रामीण रुग्णालयातील तीन अधिपरिचारिकांनी दिली आहे.

त्याचबरोबर येथे कंत्राटी पद्धतीने असलेल्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रघुनाथ जोशी यांनीही आपली या रुग्णालयातील सेवा बंद करत असल्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षक विटकर यांना दिले आहे. अधिपरिचारिकानी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

ग्रामीण रुग्णालय देवगड येथे गेले तीन महिन्यापासून पुरेसा स्टाफ अधिपरिचारक नसल्यामुळे बाब प्रशासनाला तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनदेखील कोणी दखल घेत नसून, तसेच महिन्याला ४० ते ५० डिलिव्हरी आणि १५ ते २० ऑपरेशन होतात. तसेच महिन्याला २५० ते 300 आंतर रुग्ण दाखल होत असून बाहय रुग्ण विभागात मासिक तीन ते साडेतीन हजार रुग्ण उपचार घेतात,त्याच प्रमाणात इंजेक्शन व ओपीडी होते. तसेच गरोदर माता तपासणी लसीकरण इतर राबवत असलेले राष्ट्रीय कार्यक्रम होत असून,या सांभाळण्यासाठी फक्त 3 परिचारिका उपलब्ध आहेत.

एक परिवारीला दैनंदिन आकडेवारी, औषध मागणी, औषधसाठा ठेवने वरीष्ठाच्या मिटींग करने, मासिक रिपोर्ट या साठी लागत असल्यामुळे वरील सर्व रुग्णालयीन कामकाजासाठी केवळ तीन अधिपरिचारिका उपलब्ध आहेत. या बद्दल वारंवार सर्वांना कळविले असून कोणीही दखल घेत नाही. मात्र Emergency उद्भवल्यास दोन परिचारीका शिल्लक राहत असून रुग्णालयीन कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत आहे.तरी दि ०२/१०/२०२३ पूर्वी अधिपरिचारिकाच्या सातही जागा भरल्या गेल्या नाहीत,तर अधिपरिचारिका दि. ०३/१०/२०२३ पासून कामबंद आंदोलन करीत आहेत. या निवेदनावर एन. एस. जाधव, व्ही आर पारकर,एम एम मान्येकर यांच्या सह्या आहेत.

त्याचबरोबर येथे स्त्री रोग तज्ञ म्हणून सेवा देणारे जेष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रघुनाथ जोशी यांनीही स्टाफची कमतरता असेल तर काम करण्यास असमर्थता दर्शवली असून वैद्यकीय अधीक्षकांना आपणही येथील सेवा बंद करत असल्याचे कळवले आहे. डॉक्टर जोशी यांनी सेवा बंद केल्यास देवगड ग्रामीण रुग्णालयातील गरोदर माता विषयक देण्यात येणाऱ्या सर्व सेवांवर गंभीर परिणाम होताना दिसणार आहे. तसेच देवगड ग्रामीण रुग्णालयातील डिलिव्हरी साठी केले जाणारे उपचारही बंद होणार. व याचा गंभीर परिणाम शेवटी देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे.