
सावंतवाडी : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वेत्ये गावात शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे बहुमताने विजयी झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुणाजी गावडे यांना उचलून घेत एकच जल्लोष केला.
'कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.