
सावंतवाडी : बॅ. नाथ पै सभागृहात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच काम हे बोगस पद्धतीने झाल्याचा आरोप माजी नगरसेवक राजू बेग यांनी केला आहे. याकामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
माजी नगरसेवक राजू बेग यांनी आज बॅ नाथ पै सभागृहात भेट देत या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पोलखोल केला. सभागृहामध्ये बसवण्यात आलेल्या खुर्च्या च काम हे बोगस पद्धतीने झालं आहे. या सर्व खुर्च्या हलत असल्याने राजू बेग यांनी समोर आणलं. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.