
सावंतवाडी : शहरातील मुख्य बाजारपेठेत मे महिन्यात केलेला रस्ता जुलै अखेरीसच वाहून गेला. रहदारीच्या या रस्त्यावर खड्ड्यांच साम्राज्य निर्माण झाल असून सोमवारी ठेकेदाराने हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होत. चुकीच्या पद्धतीने होणार हे काम युवा सैनिक प्रतिक बांदेकर यांनी रोखलं.
नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठेत येणारा हा रस्ता मे महिन्यात केला होता. मात्र, हा रस्ता जुलै संपेपर्यंतही तग धरू शकला नाही. पाहिल्याच पावसात डांबर वाहून गेल्यानं ठेकेदाराच पितळ उघड पडलं. निकृष्ट दर्जाचे काम करत डांबरात पैसै खाल्ल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे. दरम्यान, सोमवारी खड्डे बुजवा मोहीम ठेकेदारान हाती घेतली. प्लास्टिक पिशव्या व सिमेंटच पाणी टाकत हे काम सुरु होतं. चुकीच्या पद्धतीने होणार हे काम युवा सैनिक प्रतिक बांदेकर यांनी रोखले. ठेकेदाराला योग्य पद्धतीने काम करण्याची सुचना त्यांनी केली. यानंतर पुन्हा या कामाला सुरूवात करण्यात आली. तिनं महिन्यात रस्त्याची झालेली अवस्था बघता ठेकेदारानं लोकांचा पैसा खड्ड्यात घातल्याच स्पष्ट होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर न.प. बांधकाम विभाग व प्रशासन कोणती कारवाई करत याकडे शहरवासीयांच लक्ष लागलं आहे.