बस चालकाचे नियंत्रण सुटले

तिलारी घाटात जयकर पॉईंट इथं अपघात
Edited by:
Published on: November 30, 2024 12:43 PM
views 409  views

दोडामार्ग : कर्नाटक हुन तिलारी घाट मार्गे गोवा येथे जाणाऱ्या मिनी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिलारी घाट जयकर पॉईंट येथे अपघात घडला. या अपघातात बसचे दर्शनी भागाचे नुकसान झाले व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना त्यांना उपचारासाठी बेळगांव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती आशिकी कर्नाटक बेळगाव येथून पर्यटकांना घेऊन एक खाजगी मिनी बस तिलारी घाट मार्गे गोव्याला जातं होती.

तिलारी घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथे ही बस आली असता चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि त्याच जयकर पॉईंट येथे अपघात होऊन बरेच दिवस असलेल्या कंटेनरला ही बस जाऊन आदळली व बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. बस कंटेनरला आदळताच बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. यावेळी त्या प्रवाशांना बेळगांव येथील रुग्णालयात उपचारसाठी पाठविण्यात आले. 

दरम्यान, बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यावेळी अपघात ग्रस्त होऊन पडलेल्या त्या कंटेनरला ही बस जाऊन आदळली व मोठा अनर्थ टळला. मात्र त्या ठिकाणी अपघात ग्रस्त तो कंटेनर नसता तर ही बस त्या खोल दरीत पडून मोठा अपघात घडला असता असे त्या ठिकाणी असलेल्या इतर वाहन चालकांनी यावेळी सांगितले.