
सावंतवाडी : तळवडे - खेरवाडी येथील बीएसएनएल टॉवरचे काम पूर्ण होऊन दीड वर्ष झाले असून अद्याप सेवा सुरू केलेली नाही. हा टॉवर तात्काळ सुरू करावा अशी मागणी तळवडे ग्रामपंचायत सदस्य केशव परब यांनी केली. दोन महिन्यांपूर्वी बीएसएनएल कार्यालयात भेट देण्यात आली होती. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सेवा सुरू करण्याची हमी दिली होती. परंतु आतापर्यंत सेवा सुरू केलेली नाही. तात्काळ या टॉवरची सेवा सुरू करावी. ही सेवा तात्काळ सुरू न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा देण्यात आला.