कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली सापडला विद्यार्थ्यांचा मृतदेह

Edited by: मनोज पवार
Published on: July 13, 2024 07:30 AM
views 1694  views

चिपळूण : शहरातील डीबीजे महाविद्यालय येथे शुक्रवारी मुसळधार पावसात संरक्षक भिंत कोसळली होती, दरम्यान आज शनिवारी या कोसळलेल्या भिंतीखली एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील व सध्या लोटे येथे राहून डीबीजे कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणारा सिद्धांत प्रदीप घाणेकर, वय १९ हा काल दुपारपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला जात होता. त्याच्या मोबाईलचे लोकेशन कॉलेजच्या या संरक्षक भिंतीच्या येथे दाखवले गेले. अखेर आज शनिवारी ही कोसळलेली संरक्षक भिंत बाजूला करण्यात आली. याखाली सिद्धांत घाणेकर याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे कॉलेज प्रशासनाने कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती आहे.